चार भष्ट्राचारी एक्यांना खुर्चीवरुन धक्का देण्यासाठी संघटीत व्हा : आ. किशोर जोरगेवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मनपासमोर यंग चांदा ब्रिगेडचे भव्य आंदोलन, भष्ट्राचारी सत्ताधा-यांच्या खूर्चा खाली करण्याचा संकल्प

चंद्रपूर : जिथे जाऊ तिथे खाऊ या भाजपच्या धोरणामूळे चंद्रपूर महानगर पालिका भष्ट्राचाराचे माहेरघर बनले आहे. चंद्रपूरकरांच्या पैशाची उधळपट्टी करत स्वताच्या हाउसापूर्ण करणा-या या पदाधिका-यांना धडा शिकविण्याची गरज असून येथील चार भष्ट्राचारी एक्यांना खुर्चीवरुन धक्का देण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. मनपातील भष्ट्राचारा विरोधात आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिकेसमोर चार एक्के दे धक्के हे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगर सेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, ग्रामीण विभागाच्या महिला अध्यक्षा सायली येरणे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अन्वर अली, अल्पसंख्याक विभागाचे संघटक सलीम शेख, युवा नेते अमोल शेंडे, करणसिंह बैस, कामगार क्षेत्राचे संपर्क प्रमूख विश्वजित शाहा, विलास वनकर, हरमन जोसेफ, नितीन शाहा, विदयार्थी आघाडी अध्यक्ष अजय दुर्गे, चंद्रपूर ग्रामीण तालूकाध्यक्ष राकेश पिंपळकर, शिक्षण वीभागाचे प्रतिक शिवणकर, देवा कुंटा, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, राम जंगम, विनोद अनंतवार, ग्रामीण संघटक मुन्ना जोगी, रुपेश कुंदोजवार, प्रेम गंगाधरे, चंपा बिश्वास, मुन्ना लोढे, आदिवासी विभागाच्या शहराध्यक्ष वैशाली मेश्राम, कविता शुक्ला, स्टिल कामगार संघटना अध्यक्ष रुपेश झाडे, आनंद रणशूर, बहुजन समाज आघाडीच्या अध्यक्षा विमल काटकर, वैशाली रामटेके, पौर्णिमा बावणे, कल्पना शिंदे, सरिता दंडारे, अल्पसंख्याक विभागाच्या महिलाध्यक्ष कौसर खान, निलीमा वनकर, माधूरी निवलकर, रुपा परसराम, अस्मिता डोनारकर, माला पेंदाम आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर महानगर पालिकेतील सत्ताधारी जनतेच्या पैशाची लूट करत आहे. कोरोना काळात व्हेंटीलेटर युक्त अॅंब्यूलंस खरेदी करण्यासाठी निधी नसल्याचे सांगणा-या महापौरांनी मनपाच्या पैशातून 11 लाखांची गाडी खरेदी केली इतकेच नव्हे तर 70 हजार रुपये अतिरिक्त खर्च करत 1111 हा व्हीआयपी नंबर मिळविला जनतेच्या पैशावर असा व्हीआयपी थाट करणे योग्य नाही. मनपाच्या 200 कोटींच्या कामात अनियमीतता असल्याचे लेखा परिक्षणात आढळून आले. कोरोना काळात याच सत्ताधा-यांनी डब्बा घोटाळा करत गरजू जनतेचे थट्टा करण्याचे काम केले. दोन वर्षात पूर्ण होणार असलेली अमृत योजना पाच वर्षात या पालीकेला पूर्ण करता आली नाही. आझाद बाग घोटाळा, कचरा संकलन घोटाळा, कोविड घोटाळा, प्रसिघ्दी निवीदा घोटाळा, मालमत्ता कर मुल्यांकन घोटाळा, दलीत वस्ती सुधार निधी घोटाळा, शहरातील रस्ते घोटाळा, मास्क खरेदी घोटाळा असे अनेक घोटाळे करत ही महानगर पालिका राज्यातील सर्वाधीक भ्रष्ट पालीका ठरली आहे. या सर्व घोटाळ्यांमूळे करदात्या नागरिकांच्या घामाचे पैशाची या सत्ताधा-यांनी अक्षरशः लूट केली आहे. महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, हे पालिकेतील भ्रष्ट तीन एक्के आणि बाहेरचा म्हणजेच रेमडीसीव्हीर घोटाळेबाज डॉ. मंगेश गुलवाडे या चार एक्क्यानी एक मत करत महापालिकेला भ्रष्टचाराचे माहेरघर बनविले आहे. असा आरोप यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. मात्र आता सत्ताधा-यांचा पापाचा घडा भरला असून चंद्रपूरकर जागृत होत आहे. येत्या मनपा निवडणूकीत जनता यांच्या खुर्च्या खाली करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत मिळाली पाहिजे ही मागणी मी सोडलेली नाही. या मागणीसाठी आजही माझा संघर्ष सुरु आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी यासाठी मी आवाजही उचलला आहे. मात्र या मागणीला भाजपचे समर्थन आहे की विरोध हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनही आ. जोरगेवार यांनी यावेळी बोलतांना केले.

दुपारी दिड वाजताच्या सुमारास यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातून सदर अभिनव आंदोलनाला सुरुवात झाली. शहराच्या मुख्यमार्गाने गोल बाजार होत मनपा प्रशासना विरोधात नारेबाजी करत हातात फलके घेऊन आंदोलनकर्ते महानगर पालिकेवर धडकले. यावेळी आंदोलनाचे सभेत रुपात्तंर झाले. या आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.