भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा शेण फासून जाहीर निषेध

घुग्घुस : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर याने महाराष्ट्रातील ओबीसी नेते बहुजन कल्याण मंत्री, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांच्या विरोधात महाज्योती संस्था व जिल्ह्यातील दारू बंदी उठविल्या संदर्भात खालच्या स्तराचे बेताल वक्तव्य करून राज्यातील जनतेसह काँग्रेस कार्यकर्त्यांचे मन दुखविली या निषेधार्थ घुग्घुस शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज सांयकाळी नवीन पाणी टाकी जवळ खुल्या परिसरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोड्या – चप्पलेचे हार घालून

“गोपीचंद मुर्दाबाद’ अश्या घोषणा देण्यात आल्या व भाजप आमदारांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, लखन हिकरे, नुरुल सिद्दिकी, विजय माटला, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, निखिल पुनघंटी, अंकुश सपाटे, शुभम घोडके, विशाल मादर, कपिल गोगला, सोनू लिंगलवार, संजय कोवे, शफी भाई, साहिल गोगला, देव भंडारी, सुनील पाटील, नबी शेख, रंजित राखुडे, सचिन कोंडावार, आरिफ शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.