‘नगरपरिषद जळीत प्रकरण’ एसीसी फायर ब्रिगेड रक्षकांना डावलून नेत्यांनी यंत्रणा हाताळणे नियमबाहय घटना

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : लष्कर, वैदकीय क्षेत्र, तसेच अग्निशमन दलात काम करणारे हे प्रशिक्षित घेतलेले तरबेज लोक असतात. रुगणाचा उपचार हे डॉक्टरच करू शकतो सामान्य नागरिकांने ऑपरेशन केल्यास तो गुन्हा होतो. तसेच अग्निशमन दलातील सुरक्षा रक्षका ऐवजी इतर कुणी त्यांच्या जागी जागी आग विजविण्याचे कार्य केल्यास हे कायदेशीर गैर ठरेल असाच प्रकार घुग्घुस येथे घडला आहे.

येथील नगरपरिषदे मधील ग्रामपंचायत काळातील दस्तावेज व इलेक्ट्रिकल साहित्य असलेल्या गोदामाला बुधवारी पहाटे आग लागली ही आग अत्यंत भीषण होती यामुळे परिसरातील लोकवस्तीत आगीचा भडका उडून मोठी जीवितहानी झाली असती ही आग विजविण्यासाठी एसीसी कंपनीतील अग्निशमन वाहन (फायरब्रिगेड) एक अधिकारी व चार प्रशिक्षित सुरक्षाकर्मी सह बोलविण्यात आले होते. मात्र पहाटे लागलेल्या आगीत उपस्थित असलेल्या नेत्यांनी स्वतःलाच फिल्मी हिरो समजून कायद्या – नियम बाजूला ठेवून फायर ब्रिगेडच्या साहाय्याने आग विजविण्यास सुरुवात केल्याचे व्हिडीओ वायरल झाले .

या चमकोगिरीत जर वेळेवर आगीवर नियंत्रण मिळाले नसते किंवा एखादा अपघात झाला असता तर याला जवाबदार कौन ?

ज्या ठिकाणी प्रशिक्षित यंत्रणा काम करण्यास सज्ज आहे. त्याठिकाणी त्यांच्या हातातून पाण्याचा बंब घेऊन स्वतःच आग विजविणाऱ्यावर कारवाई होईल काय ?
या संदर्भात एसीसी सुरक्षा नियंत्रण अधिकारी जोगिंदर सिंग यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशनच्या बोलविण्यावरून आम्ही आग विजविण्यासाठी आलो हे एक जोखमीचे काम असून यातील लहान पाईपच्या प्रेशर देखील हानी पोहचवू शकतो मात्र त्याठिकाणी असलेल्या नेत्यांनी फोटोसेशन करीता पाईप हिसकावून घेतले आमचा नाइलाज झाला होता.

यापूर्वी ही वेकोलि व एसीसी कंपनी तर्फे शहरात सॅनीटाईजर करण्यासाठी फवारणी यंत्र आणण्यात आले होते त्यावेळेस ही चक्क वाहनावर चढुन आपणच मशीन द्वारे फवारणी करीत असल्याचा अविर्भावात फोटोसेशन या नेत्यांतर्फे करण्यात आले होते. आणि हीच परंपरा या “विशिष्ट” पक्षा तर्फे निरंतर सुरूच आहे.