घुग्घुस (चंद्रपूर) : शहरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट व वियानी विद्या मंदिर या दोन इंग्रजी शाळांनी शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. यासंदर्भात पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधीकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या शाळेत परिसरातील पालक वर्गाचे मुले शिक्षण घेतात. मागील वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शालेय विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही.
शासनाने ही शाळा बंद ठेवल्या होत्या. शासनाने टाळेबंदी घोषित केल्याने नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्यांचे काम धंदे बंद झाले व कोणीही कामा धंद्यावर जात नव्हते. त्यामुळे गोर गरीब, मंजूर वर्ग व छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीने देखील कठीण झाले. पालक वर्गाची आर्थिक परिस्थितीखराब झाली.
त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या मुलांची शालेय शुल्क भरू शकले नाही. भरमसाठ शालेय शुल्क भरणे अवघड असल्याने पन्नास टक्के शुल्कात सवलत देण्यात यावी, अशी मागणी शंकर सिध्दम, गाेकुल एदुलवार ,मेट्टा ओदल, देवराज गडपल्लीवार, श्रीनिवास लक्काकुला प्रविन बनपुरकर, डॉ.सुनिल दुधे, बंडीवार, शारदा गाेडसेलवार, सविता यार्दी, अम्रापाली काटकर, सविता मेडापे पालक वगनि शिक्षणधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.