बगीचा कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार; काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीची मागणी

0
537

चंद्रपूर : घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत भाजप शासनाच्या वर्ष 2017 ते 2020 याकाळात विविध वॉर्डात एकूण दहा बाल उद्यान निर्माण करण्यात आलेले आहे. या उद्यानाला प्रत्येकी अंदाजे जवळपास ७५ लाख ते एक कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. या कामात वाजवीपेक्षा जास्त शासकीय निधी खर्च करण्यात आला असून, याकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला आहे. याकामाची सखोल चौकशी करून संबंधीत ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी घुग्घुस शहर काँग्रेस पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची भेट घेवून निवेदन दिले.

याप्रकरणातील परिपूर्ण माहिती देऊन या भ्रष्ट्राचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर उपस्थित होते.