जंगलात काटेरी कुंपण आणण्यासाठी गेलेल्या मामावर वाघाचा हल्ला; जागीच ठार

0
347
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : भाचाच्या गावी पाहून आलेला मामा जंगलात काटेरी कुंपण आणण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सावली वन परिक्षेत्र अंतर्गत पाथरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६७९ मध्ये करगाव जंगलात घडली. दादाजी पांडुरंग म्हस्के असे मृत शेतक-याचे नाव आहे.

डोंगरगाव निवासी दादाजी मस्के हे करगाव येथे भाचा रामरतन रोहणकर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी पाहुणे म्हणून आले होते. भाचाला घरी लावण्यासाठी काटेरी झाडाचे कुंपण लागत असल्याने आज बुधवारी सकाळच्या सुमारास मामा दादाजी मस्के हा भाचा रामरतन रोहणकर व त्याचे मुलासोबत सावली वन परिक्षेत्र अंतर्गत पाथरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६७९ मध्ये गेला होता. दरम्यान तिघेही जण विखुरलेल्या ठिकाणी काटेरी झाडे गोळख करीत होते. याच जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने दादाजी मस्के यांच्या पाठीमागून हल्ला केला. मामावर वाघाने हल्ला केल्याची भनक जवळच असलेल्या भाचा रामरतन आणि त्याच्या मुलाला लागली. त्यांनी प्रचंड आरडाआओरड केली आणि धावून आले,त्यामुळे वाघ पळाला. लगेच भाचाने आपल्या मुलासह जखमी अवस्थेत पडून असलेल्या मामाला त्या ठिकाणावरून उचलून दुस-या जागी हलविले. मात्र मस्के हे गंभीर जखमी झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घरी सदर घटनेची माहिती देण्यात आली तर नागरिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

सदरा मृताच्या पश्चात ३मुले, सुना असा परिवार आहे. पाहुणा म्हणून आलेल्या भाचाच्या गावी मामाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याने डोंगरगाव आणि करगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या क्षेत्रात पट्टेदार वाघाचे वास्तव आहे. शतकरी शेतमजूर काम करताना जिव मुठीत घेवून काम करीत आहे. या घटनेमुळे शेतकरी, नागरिक भयभीत झालेआहे. वनविभागाने या परिसरात वावर असलेल्या वाघाचा बंदोबस्त करावा आणि या घटनेतील मृताच्या कुटूंबियांना तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.