आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश
चंद्रपूर : ताडाळी ते नकोडा या वळण मार्गासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली होती. ना. नितीन गडकरी यांनी याची तात्काळ दखल घेत 4 किलोमीटरच्या या काॅंक्रिट मार्गासाठी 19 कोटींचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर केल्या बदल आमदार किशोर जोरगेवार यांनीही ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.
घूग्घूस, साखरवाही, नकोडा, उसेगाव हा मार्ग तयार करण्यात यावा या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. येथील नागरिकांनीही याबाबत अनेकदा आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन दिले होते. त्यामुळे हा मार्ग तयार व्हावा याकरिता आ. जोरगेवार यांच्या हालचाली सुरु होत्या. मात्र या मार्गासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने केंद्राने निधी उपलब्ध करावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
यासाठी त्यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल ना. नितीन गडकरी यांनी घेतली असून या कामासाठी 19 कोटी ८ लक्ष रुपयांचा केंद्रीय निधी मंजूर केला आहे. त्यामूळे आता लवकरच या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असून येथील नागरिकांची जूनी मागणी सुटणार आहे. मागणीची दखल घेत सदर मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. नितीन गडकरी यांना पत्र लिहिले असून त्यांचे धन्यवाद मानले आहे.