Gopani Iron & Power (india) Pvt Ltd कंपनीने पहाटे गेटला लावले टाळे; 700 कामगारांचा तीव्र आंदोलन

चंद्रपूर : गोपाणी आर्यन अँड पॉवर व्यवस्थापण व कामगारा मधील संघर्ष अगदी टोकाला गेला असून आज सकाळ पहिल्या पाळी पूर्वी कंपनीने कुठल्याही प्रकारची माहिती सूचना कामगारांना न देता मेंनगेटला टाळे लावून कामगारांना बाहेर ठेवले.

गोपाणी कंपनीत मागील सतरा वर्षांपासून कार्यरत एकशेवीस कामगारांना 03 सप्टेंबर रोजी कंपनी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता बंद केले होते.

तर आज पहाटेच कंपनीतील ठेकेदार माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, त्यांचीच बहीण महालक्ष्मी कंपनीचे सौ.संगीता थेरे,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा भाचा मोनू चौधरी काली सेक्युरिटी सर्विस, सेलगा स्टील एजन्सी मधील जवळपास सातशे कामगारांना कामावर घेण्यास मज्जाव केला आहे. कामगारांनी वेतनवाढ मांगीतल्याचा वचपा कंपनीने एकशेवीस कामगारांना काढून व आता उर्वरित कामगारांना कंपनी बाहेर ठेवून घेतला आहे.

या कंपनी मध्ये काही जिल्हास्तराचे राजकारणी ठेकेदार असल्याने त्यांचा पाठबळ हा कंपनीला मिळत असल्याने कंपनीची मुजोरी ही दिवसागणिक वाढत असल्याने कामगारात प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून त्याची फलश्रुती हे संपावर येऊन पोहचली असून हा वाद जर वेळीच संपुष्टात आला नाही तर औद्योगिक शांती धोक्यात येईल.