चंद्रपूर महामार्ग पोलिसांतर्फे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम

चंद्रपूर : महामार्ग पोलिसांतर्फे राज्य महामार्ग क्रं. सात वर पडोली ते घुग्घुस रस्त्यावरील घुग्घुस येथे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी दुचाकी चालवीतांना नेहमी हेल्मेटचा वापर करणे, मोबाईलचा वापर टाळणे, कागदपत्रे सोबत ठेवणे, ट्रिपल सीट प्रवास न करणे, दारू पिऊन वाहन न चालवीने, सुरक्षित अंतर ठेऊन वाहन चालवीने, खात्री करून वाहणास ओव्हरटेक करणे, वेग मर्यादेचे पालन करणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालवीने, अपघाता समयी मदत करणे अश्या वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या तसेच मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी चंद्रपूर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी, घुग्घुसचे वाहतूक पोलीस विनोद लोखंडे, राहुल मसादे व मोठ्या संख्येत चालक व प्रवाशी उपस्थित होते.

हा प्रबोधनाचा कार्यक्रम डॉ. भूषणकुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक (वा) महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्वेता खेडकर पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर, मा. संजय पांडे पोलीस उपअधीक्षक प्रादेशिक विभाग नागपूर व पोलीस निरीक्षक श्रीमती वैरागडे मॅडम विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.