उपसरपंच यांनी केला महिलेचा विनयभंग

भद्रावती तालुक्यातील सागर येथील घटना

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील सागरा येथील 26 वर्षीय महिलेचा उपसरपंचांनी विनयभंग केल्याची घटना बुधवारला रात्री दरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर नथ्थू रासेकर वय 45 उपसरपंच राहणार सागरा असे आरोपीचे नाव आहे हा उपसरपंच तसेच सरपंचाचा सुद्धा कार्यभार याठिकाणी सांभाळत आहे झालेल्या निवडणुकीत फिर्यादीच्या परिवाराने आपणास निवडणुकीत मदत केली नाही दुसऱ्या गटाला मदत केली याबाबत त्यांच्या मनात राग होता. फिर्यादीच्या भावाला रोजगार नसल्याने गावात चिकन विक्रीचे दुकान लावले होते या रासेकर उपसरपंच्याने गावात चिकन विक्री करायची नाही म्हणून शिवीगाळ करून दुकानाची तोडफोड केली.

या घटनेची शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पुन्हा फिर्यादीच्या भावाने गावात चिकन विक्री चे दुकान लावले असल्याचे पाहून उपसरपंच हा फिर्यादीच्या घरी गेला व त्या महिलेला तुझा भाऊ कुठे आहे असे म्हणत शिवीगाळ केली असे म्हटल्यावर तिला सुद्धा शिवीगाळ करत तिच्या घरात घुसला व तिच्या अंगावरील कपडे काढून तिचा विनयभंग केला ही घटना घडत असताना शेजारी एकत्र आले तेव्हा आरोपी तिथून निघून गेला या घटनेची तक्रार शेगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली परंतु अजून पावेतो आरोपीला अटक करण्यात आली नाही.