दारूच्या नाहरकत प्रमाणपत्रावरुन ग्रामसभेत मारहाण आरोपीवर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : व्याहाड खुर्द येथे ग्रामसभेला दारूच्या नाहरकत प्रमाणपत्रावरुन ग्रामसभेत विषय सुरू असताना या विषयी वाईन शॉप उघडण्यासाठी दोन अर्ज करण्यात आले. त्यात कविंद्र पत्रुजी रोहणकर व्याहाड खुर्द यांचा अर्ज वाईन शॉप करिता होता.

त्या ग्रामसभेत विषय सुरू असताना काही लोक एकालाच नाहरकत प्रमाणपत्र द्याच आणि दुसऱ्याला नाही अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कविंद्र पत्रुजी रोहणकर यांनी ग्रामसभेत एकालाच नाहरकत प्रमाणपत्र? द्यायची तर दोघांना द्या अन्यथा दोघांनाही नाही . अस युक्तीवाद सुरू असता. ग्रामसभेतील अनिकेत विशाल शेडमाके नामक व्यक्ती ने अस्लील शिवीगाळ करुन मला मारण्याकरिता अगांवर धावुन आला त्यावेळी माझा मुलगा यांनी मध्यस्थी येताच माझ्या मुलाला मारहाण केली. व तो रक्तबंबाळ झाला.

त्याबद्दल पोलीस तक्रार दाखल केली. त्यावरून फिर्यादीवर कलम २९४,३२३,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला तात्काळ अटक करण्यात यावी.
ग्रामसभेतील हा विषय घेत असताना कविंद्र पत्रुजी रोहणकर यांना नाहरकत प्रमाणपत्र देवु नये. अशी भूमिका येथील सत्ताधारी पक्षपात करून जर ग्रामसभा एकाच विषयाला एकालाच मंजुरी व दुसऱ्याला ना मंजुरी हे ग्रामसभेला दुझा भाव करणारा विषय आहे म्हणून या ग्रामसभेत दोघानाही नाहरकत प्रमाणपत्र द्यावे नाही तर ग्रामसभा रद्द करावी अशी मागणी व्याहाड खुर्द नागरिकांची आहे.