वैनगंगा नदीत युवकाची आत्महत्या

चंद्रपूर : चंद्रपूर – गडचिरोली महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज 2 वाजताचे सुमारास घडली.

राकेश सुधाकर हजारे (24) असे मृतकाचे नाव असून तो सावली तालुक्यातील अंतरगाव येथील रहिवासी असल्याचे समजले. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच घटनास्थळी हजर होऊन शोध घेत आहेत.

वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही पुढील तपास पोलीस करीत आहेत.