नगरपरिषदेत लागलेल्या आगीत खरंच भ्रष्टाचार जळाला का ?

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील नगरपरिषदेच्या गोदामात पावसाळ्यात सतत पाऊस येत असतांना 08 सप्टेंबरच्या पहाटेस अचानकपणे आग लागली या आगीत ग्रामपंचायत काळातील दस्तावेज, सह इलेक्ट्रिकल साहित्य जळून राख झाले आग तर कधीचीच विझली मात्र अनेक जळजळीत प्रश्न सोडून गेली.

वर्ष दोन हजार साली या ग्रामपंचायत मधील 09 कोटी 51 लाख रुपयांचे तथाकथित भ्रष्टाचाराचे कागदपत्रे खरंच जळाले काय ?

सतत पाऊस असतांना इतक्या मोठ्या शहरात नेमक्या याच ठिकाणी आग का लागली ?

याच परिसरात अन्य इमारतीला का नाही ?

याच प्रकरणात चार वर्षांपूर्वी कागदपत्रे असलेल्या जिल्हापरिषदच्या खोलीतच आग कशी लागली ?

ज्यांच्याशी भ्रष्टाचाराचे प्रकरण निगडीत आहे तेच घटनास्थळी सर्वात आधी कसे पोहचले ?

वीज मंडळाची तपासणी चाचणी रिपोर्ट आला नसतांना शॉर्टसर्किटने आग लागल्याचा दावा करण्याची घाई कशासाठी ?

काँग्रेस नेते राजूरेड्डी यांच्या सी.आय.डी चौकशीची मागणी पूर्ण होईल काय ?

09 कोटी 51 लाख रुपयांच्या घोटाळयाची फाईल पुन्हा नव्याने उघळेल काय ?

याप्रकरणा कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
मात्र याची उच्चस्तरीय चौकशी होईल की नाही यात ही शंकाच आहे.