काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करा : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : काँग्रेसची विचारधारा ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हिताची आहे. सामाजिक कार्याला सत्तेची जोड असल्याशिवाय गोरगरीब समाजबांधवांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होणार नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी वरोरा येथे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केले

प्रवीण चौधरी, अमोल झेले, किरण घोडमोरे, आकाश तेलरांधे, मंगेश बावणे, अनिल कोटरंगे, संतोष कोलगले, अक्षय पेंदाम, मंगेश टेकाम यासह वरोरा तालुक्यातील टेंभुर्डा येथील शेकडो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, काँग्रेस पक्ष हा विशाल महासागर आहे. काँग्रेस पक्षात कोणीही प्रवेश करू शकतो. काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी काही गोष्टी करणे भाग असते. त्याचाच एक भाग म्हणून इतर पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करते. पुढे देखील अशाच प्रकारे संघटन वाढीकरिता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.