काँग्रेस अनुसूचित जाती विधानसभा अध्यक्षपदी सुनिल पाटील

तालुका सचिवपदी सदाशिव खोब्रागडे यांची नियुक्ती

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीनजी राऊत,अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष विजय आंबोरे, पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या आदेश व सूचनेनुसार सुनील विश्वनाथ पाटील यांना अनुसूचित जाती विभागाचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली तर सदाशिव संजय खोब्रागडे यांची चंद्रपूर तालुका सचिवपदी निवड करण्यात आली.

चंद्रपूर वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळु भाऊ धानोरकर, व अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत नेऊन राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन खासदार बाळु धानोरकर यांनी केले.