वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गडचिरोली : कोरची तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर मसेली गावानजीक असलेल्या सावली येथील जंगलात वीज कोसळून शंभराहून अधिक शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल(ता.९) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन येत असतात. यंदा हे मेंढपाळ दोन डेरे घालून वसलेले आहेत. त्यापैकी एक डेरा बेळगाव परिसरात, तर दुसरा डेरा सावली परिसरात आहे. दोन्ही डेऱ्यांमध्ये ७-८ परिवारांचा समावेश आहे.

९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास सावली परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. अशातच अचानक डेऱ्याजवळच वीज कोसळल्याने जवळपास ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाल्या. यामुळे मेंढपाळांचे सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी २ ते ३ किलोमीटर पायी चालून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली