समाज बांधनीत शिक्षकांची भुमीका महत्वाची – आ. किशोर जोरगेवार

0
193
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमीक शिक्षक समीतीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन, ४० शिक्षकांनी केले रक्तदान

चंद्रपूर : देशाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांकडून सामाजिक उपक्रमातून समाज प्रबोधनाचे सुरु असलेले काम कौतूकास्पद आहे. समाजात होणा-या चांगल्या गोष्टींचे दखल शिक्षकांकडून तात्काळ घेतल्या जात आहे. आयोजीत रक्तदान व कोरोना योध्दांच्या सत्काराचा कार्यक्रम हा त्याचेच प्रतिक असून  समाज बांधनीत शिक्षकांची भुमीका नेहमीच महत्वाची राहिली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमीक शिक्षक समीतीच्या वतीने तुकूम येथे रक्तदान शिबीर, कोरोना योध्दांचा सत्कार व दिनदर्शीका प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगर सेवक अनिल फुलझेले, विजय भोगेकर, हरिष ससनकर, अल्का ठाकरे, नारायण कांबळे, दिपक व-हेकर, नारायण कोरेकर, सुनिता ईटनकर, आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही शिक्षकांची भुमीका महत्वाची ठरु लागली आहे. समाजिक प्रश्नांची जाण आणि दाणगा अभ्यास यातून आता शिक्षक समाजातील प्रश्नांवर केवळ व्यक्त होऊ लागले नसून त्या विरुध्द लढा ही उभारु लागले आहे. शिक्षकांच्या सुचनांचा आदर केला गेला पाहिजे, त्यांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्या गेल्या पाहिजे, शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. शिक्षण देण्यासह इतर शासकीय कामाचे त्यांच्यावर अतिरिक्त ताण आहे. याची मला कल्पाना अल्याचेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. एक लोकप्रतिनीधी म्हणून शिक्षकांचे अनेक प्रश्न सर्वोच्च सभागृहात मला मांडला आले याचेही समाधान असल्याची भावणाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. रक्तदान शिबीरात रक्तदान करणा-या सर्व रक्तदात्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमात रक्तदान करणा-या रक्तदात्यांच्या व कोरोना योध्दांचा आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.