अपार्टमेंट मधील सट्टाबाजाराचा पर्दाफाश

0
404
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चौघांना अटक, अटकेत प्रख्यात बिल्डरचा समावेश

वणी (यवतमाळ) : शहरात लग्न वरातीचा बनाव करत जिल्हा पोलिस दलाचा ताफा शहरात खाजगी बसने रविवारी दाखल झाला. गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसर गाठल्यानंतर लगतच असलेल्या अपार्टमेंटवर अचानक धाडसत्र अवलंबले आणि सुरू असलेल्या सट्टाबाजाराचा पर्दाफाश केला. सटोडया बिल्डरला रंगेहात पकडून एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे. तर अपारमेंट मध्ये चालणाऱ्या सट्टा बाजाराचा जिल्हा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
जमीर मेहबूब खान (३८), रियाज सत्तार शेख ( ३२), एजाज अली ताहीर अली ( ४०), मोहम्मद सहेब मो.शब्बीर चिनी (२४) या चौघांना ब्रेस ब्रँड हिट विरुद्ध सिग्नि सिक्सर या सुरू असलेल्या सामन्यावर जुगार खेळतांना आढळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याजवळून ३८ हजार ७६० रुपये नगदी, ४५ मोबाईल संच, २ लँडलाइन फोन, ३ लॅपटॉप, १ एलईडी टीव्ही, २ पोपट लाईन संच २ किंमत ५ लाख ९३ हजार असा एकूण ६ लाख ३२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात सायबर ब्रँचचे एपीआय अमोल पुरी, महिला सेल प्रमुख शुभांगी आगाशे, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, कविष पाळेकर, उमेश इसाळकर, महेश पांडे यांनी केली.