बैलबंडी – सायकल सह पेट्रोल – डिजल – गॅस दरवाढी निषेधार्थ काँग्रेसचा निषेध मोर्चा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस (चंद्रपूर) : ‘अच्छे दिन आयेगेे’ बहोत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार असे गाजर दाखवीत सत्तेत आलेल्या श्रीमंत व उद्योगपतीच्याच विकासासाठी झटणाऱ्या या भाजप सरकारने पेट्रोल – डिजल – गॅसच्या किमतीत भंयकर अशी दरवाढ करून देशातील सर्व सामान्य नागरिकांचे जगणेच कठीण केले आहेत.

कोरोना काळात रोजगार गमावलेल्या नागरिकांना छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्या ऐवजी हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करून फसविले व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कचच्या तेलाची किंमत कवडीमोल झाली असतांना नागरिकांना कमी किमतीत पेट्रोल – डिजल देण्या ऐवजी इतिहासात कधी न झालेले पेट्रोल व डिजल दर एकसमान करून देशाच्या नागरिकांची लूट केली व दररोज पेट्रोल – डिजल, स्वयंपाक गॅसचे किमतीत वाढ करून नागरिकांच्या खिश्यावर उघड दरोडा घालणाऱ्या या सरकारचे निषेध नोंदविण्या करीता दिनांक 11 फरवरी रोजी दुपारी 4 वाजता घुग्घूस काँग्रेस तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला

बैलंबंडी त्यावर कार आणि मोटरसायकल ठेवून आणि सोबत सायकल घेऊन भव्य अशी रैल्ली ड्रा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (पोळा मैदान) येथून काढण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष) पवन आगदारी (अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष) सैय्यद अनवर (कामगार नेते) तौफिक शेख (युवक अध्यक्ष)सुरज कन्नूर (युवा नेते) शेखर तंगडपल्ली, कल्याण सोदारी,लखन हिकरे,सुरज बहुराशी, देव भंडारी,प्रफुल हिकरे,जावेद कुरेशी,अनिरुद्ध आवळे, विशाल मादर, रोशन दंतालवर, बालकिशन कुळसंगे,साहिल सैय्यद सौ.रंजीता आगदारी,सौ.अलका पचारे, सौ.पद्मा रेड्डी,सौ.विजया बंडीवार,सौ.संगीता बोबडे, सौ.गिता सोदारी,सौ.यास्मिन सैय्यद, सौ.पदमा त्रिवेणी, सौ.मंगला बुरांडे, वंदना क्षीरसागर,