विवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या

चंद्रपूर : सावली तालुक्यातील अंतरगांव येथील एका विवाहित महिलेने घराजवळ असलेल्या विहिरी मध्ये उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (15 जून) रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. भूमिका प्रशांत ठाकरे वय 25 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.

तिचे 4 वर्षा पूर्वी च लग्न झाले होते.येथून जवळ असलेल्या मेहा बुज येथील डंबाजी गंडाटे यांची ही मुलगी आहे. दिनांक 14 ला दिवस भर शेतात काम केल्या नंतर सायंकाळी सर्वांचे स्वयंपाक बनवून शौचास जातो म्हणून ति बाहेर पडली. मात्र बराच वेळ होवून ही भूमिका अजूनही आलेली नाही म्हणून तीचा सर्वत्र शोध घेतला असता जवळ असलेल्या विहिरीजवळ टमरेल दिसला त्यामुळे विहिरी तर नसेल म्हणून गळ टाकून पहिले असता साडी लागली.सदर घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली त्यावरून आज ठानेदार बंसोड़ घटनास्थळी येवून पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेची चौकशी सुरु असून भूमिकाने आत्महत्या का केली हे मात्र अजुन ही कळलेले नसून पाथरी पोलिस पुढील तपास करित आहे.