बालाजी ज्वेलर्स फोडणाऱ्या 4 आरोपीला अटक

0
1001
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

शुक्रवारला रात्री शटरचा टाळा तोडून चोरी केली

घुग्घुस (चंद्रपूर) : शहरातील बँक ऑफ इंडिया जवळ श्री बालाजी ज्वेलर्स हे दुकान असून शुक्रवारला रात्री दरम्यान काही अज्ञात चोरट्यानी शटरचा टाळा तोडून आत प्रवेश केला व 64 हजाराचा ऐवज चोरून नेला.हि घटना शनिवार ला सकाळी दुकानदार सतीश रंगूवार रा. घुग्घूस हे दुकान उघडण्यास गेले असता शटरचा टाळा तोडून दिसला. यामुळे त्याला दुकानात चोरी झाल्याचा संशय आला.

यामुळे त्यांनी येथील पोलिसाना माहिती दिली माहिती मिळताच सहा.पो.नि.मेघा गोखरे,गुन्हे पथकाचे सहा. फौजदार गौरीशंकर आमटे,सचिन बोरकर,रंजित भुरसे, निलेश तुमसरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.व सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले असता तीन अज्ञात आरोपी दिसून आले फिर्यादीच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात येऊन चौकशी सुरु करून आरोपी स्वप्नील अशोक चांदेकर (25) रा. सेवा नगर वणी, सूरज अशोक भोगे (25)रा. निंबूनी भोगे ता. धामणगाव रेल्वे, सुनिल उर्फ कैलास गिरी(22 )रा. हिंगणगाव ता. धामणगरव ऋषिकेश अशोक मोहिते (20)रा निंबूनी भोगे यांना कलम 457,380 भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली व त्याच्याकडुन मोबाईल,चांदीच्या अंगठ्या,पल्सर दुचाकी वाहन,असा एकूण 1 लाख 10 हजाराचा माल हस्तगत करून त्यांना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यातील उर्वरित माल हस्तगत करणे असल्याने न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मध्ये पाठविले पुढील पोलीस अधीक्षक साळवे, उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहा.फौजदार गौरीशंकर आमटे, मनोज धकाते, प्रकाश येरमे, महेंद्र वनकवार, रंजित भुरसे, सचिन बोरकर, सचिन डोये, नितीन मराठे, रवींद्र वाभिटकर यांनी पार पाडली गुण्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे गौरीशंकर आमटे करीत आहे.