तेलंगणातील कुर्ता यात्रेत रंगला भक्तीचा चैतन्यमय सोहळा

0
165
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सिमावर्तीत भागात असलेल्या तेलंगणातील कुर्ता मंदीरात महाशिवरात्रीला भक्तांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रातील हजारो भक्तांनी येथिल मंदीरात माथा टेकला.महाराष्ट्रात कोरोनामुळे यात्रा महोत्सव रद्द झाले असल्याने भक्तांनी कुर्ता यात्रेला पसंती दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचा सिमावर्तित भागात असलेल्या तेलंगणा राज्यातील कुर्ता येथे शिवमंदीर तथा हनुमान मंदीर आहे.दोन्ही बाजूनी वर्धा नदीचा पात्राने वेढलेल्या बेटावर हे मंदीर विराजमान आहे.

दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते.महाराष्ट्र-तेलंगणातील भाविक यात्रा महोत्सवात मोठी गर्दी करीत असतात.या वर्षी कोरोनामुळे अनेक यात्रा स्थगित झाल्या आहेत.अश्यात कुर्ता येथिल यात्रा मात्र सूरू आहे.सिमावर्तीत भागात असल्याने कुर्ता यात्रेला महाराष्ट्रातील भक्तांनी मोठी गर्दी केली.सभोवताल वर्धा नदीचे पात्र असल्याने या यात्रेला मोठे महत्त्व आले आहे.उद्या शुक्रवारला मुख्य सोहळा पार पडणार आहे.