कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या चार व्यावसायिकांवर घुग्घुस न.प. प्रशासनाच्या दंडात्मक कारवाई

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथे कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या जय अंबे हार्डवेअर, प्रेमाचा चहा, गुजरी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांवर करवाई करीत घुग्घुस न.प. प्रशासनाच्या पथकाने दंड ठोठावला आहे.

शहरात न.प प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सकाळपासून बाजारपेठेची पाहणी सुरु केली असता घुग्घुस-चंद्रपूर मार्गांवरील जय अंबे हार्डवेअर, प्रेमाचा चहा, गुजरी बाजारातील दोन भाजीपाला विक्रेते कोविड नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. न.प. प्रशासनाने जय अंबे हार्डवेअरला पाच हजार रुपये, प्रेमाचा चहाला 500 रुपये, दोन भाजीपाला विक्रेत्याला प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला व दुकाने बंद ठेवण्याची ताकीद दिली.

कोरोना खबरदारीकरिता घुग्घुस न.प. प्रशासनाने 6 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत घुग्घुस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.