वणी : कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी शासनाने ताळेबंदी जाहीर केली आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांनाही शहरातील माहेर कापड केंद्रात कापड विक्री करीत असल्याने महसूल,नगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाही करीत 50 हजाराचा दंड ठोठावला आहे.
तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे दररोज 100 च्या वर कोरोना बाधित आढळून येत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना ही मुख्य बाजारात असलेले मोठे कापड दुकानदार बाहेरून कुलूप मात्र आत ग्राहक करीत आहे बड्या दुकानदार लग्न व सणासुदीच्या फायदा घेऊन चढ्या दराने कपड्याची विक्री करीत आहे, नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे प्रशासनाच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे तरी देखील सामान मिळत असल्याने नागरिक बाहेर पडत आहे.
येथील प्रसिद्ध असलेले माहेर कापड केंद्रात आतून ग्राहक करीत असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार विवेक पांडे, मुख्याधिकारी रामगुंडे, ठाणेदार वैभव जाधव यांच्या पथकाला मिळाली पथक दुकानात पोहचले मात्र दुकानाला कुलूप लावलेले होते पथकाने गुप्त दरवाज्यातून दुकानात प्रवेश केला असता दुकानात 40 ते 50 ग्राहक आढळून आले माहेर कापड केंद्राला 50 हजार रुपये दंड देण्यात आला तर दुकानात असलेल्या प्रत्येक ग्राहकाला 200 रुपये दंड आकारून दुकानाला सील करण्यात आले या कारवाही ने बड्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे तसेच शहरात दुचाकी ने डबलशीट विना कारण फिरणार्यावर आता पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून त्यांच्यावरही कारवाही होणार असल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांनी दिली.