चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी पाऊस कोसळला
• विजांचा कडकडाट आणि विजेच्या घटना नाही

चंद्रपूर : आठवडाभरापासून विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाचे आज शुक्रवारी पहाटेपासून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर शांततेत आगमन झाले. दिवसभर जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडला. विजांचा कडकडाट आणि विजेमुळे मृत्युमुखी पडल्याची घटना जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही.

जिल्ह्यातील काही तालुक्यात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला शांततेत सुरुवात झाली तर काही तालुक्यात दिवसभर विश्रांती घेत घेत पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांनी दिलासा मिळालेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाला सुरुवात करता येणार आहे तर काही ठिकाणी आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम थांबलेला आहे.

धानाच्या पट्ट्यात शेतकऱ्यांना प-हे भरण्याकरिता थोडासा विलंब लागणार आहे. ऐरवी आठवडाभरापासून विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह येणारा पाऊस आज शांततेत कोसळल्याने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. दिवसभराच्या रिमझीम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.