आमदार किशोर जोरगेवार यांचे आरोप बिनबुडाचे : डाॅ . गुलवाडे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• आमदार महोदयांवर 5 कोटीचा मानहाणीचा दावा ठोकणार

चंद्रपूर : चंद्रपुर शहरात मागील काही दिवसांपासून महापौर – आमदार आमने सामने झाल्याचे चित्र चंद्रपुरकरांत चर्चेचा विषय ठरत आहे.
आमदार किशोर जोरगेवारांनी महापौरांच्या चारचाकी वाहनाला घेऊन ‘दे धक्का’ आंदोलन पुकारले तर विरोधात भाजपाने ही आमदार विरोधात २०० यूनिट विज बिलाचा मुद्दा घेऊन आंदोलन केले.

या आंदोलनात दोन्ही गटानी एकमेकांवर जोरदार ताशेरे ओढले यात मनपाच्या सत्तेत नसलेले भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्यावर ही आमदाराद्वारा आरोप करण्यात आले. त्यात रेमिडिसिवर इंजेक्शन ची हेराफेरी चा आरोप करण्यात आला.
या विरोधात आज डॉ गुलवाडे यांनी पत्रपरिषद घेऊन केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे असेल तर ते त्यांनी सिद्ध करावे असे ही ते म्हणाले.

आरोप करणे सर्वात सोपे काम आहे, म्हणून आ. जोरगेवार आरोपांची राजनीती करत आहे. रेमडीसीवर इंजेक्शन चा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केलेला आरोप निराधार आहे, कोविड सेंटरचे लेखा परीक्षण करण्यात आले. ही प्रशासनिक बाब आहे. लेखा परीक्षण इतर सेंटरचे ही झाले असेही ते बोलले.

आ. जोरगेवार यांच्या बिनबुडाच्या आरोपामुळे मानहानी झाली आहे. यासाठी जोरगेवार यांना नोटीस बजावला असून, लवकरच 5 कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती डॉ. गुलवाडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोटूवार, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांची उपस्थिती होती.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleकोरोनाच्या प्रादुर्भावात अडकल्या ग्रामसभा ग्रामपंचायतींसमोर अडचणी, विकासात्मक कामांना बसली खीळ
Editor- K. M. Kumar