संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेत जिल्हा बँकेने गाठला आर्थीक विकासाचा पल्ला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• जिल्हा बँकेचा एनपीए वर्षभरात १३.८७ टक्क्यांनी कमी
• सकल नफा ६० कोटी ३५ लाख १९ हजार

चंद्रपुर : चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बैंकेचे विदयमान अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या कारकिर्दीत मागील वर्षभरात जिल्हा बँकेने आर्थीक विकासाचा पल्ला गाठला आहे. वर्षभरात जिल्हा बँकेचा एनपीए १३.८७ टक्क्यांनी कमी झाला आहे. तर बँकचा नफा वाढला आहे.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बैंकेची अत्यंत वाईट परीस्थिती असतांना संतोष सिंह रावत हे बँकेचे अध्यक्ष झाले. मोठ्या आर्थीक अफरातफर झालेल्या परीस्थितीत व घोटाळ्यांनी बरबटलेल्या अवस्थेत जिल्हा बँक संतोषसिंह रावत यांच्या हातात आली. तेव्हापासून त्यांनी या शेतक-याच्या बँकेचे हित जोपासण्याकरीता काम पाहले. बँकेच्या संचालकांनी बँकेत घोळ केल्यानंतरही आर.बी.आय. च्या दिशानिर्देशानुसार भुमिका घेवुन बँकेचे कामकाज नियमित केले. व अनावश्यक खर्च कमी करुन बँकेला आर्थीक उभारी देण्याचे कार्य केले. याचा फायदा बँकेच्या आर्थीक उत्पन्नावर झाला व आज शेतक-यांच्या या बँकेने आर्थीक नफ्याचा मोठा पल्ला गाठला आहे.

३१ मार्च २०२१ अखेर बँकेची आर्थीक परीस्थिती पाहता बँकेच्या एकूण ठेवी ३४०० कोटी ३६ लाख ९२ हजार रुपये इतक्या आहेत. बँकेचे एकूण कर्ज बाकी १३५७ कोटी ४२ लाख ७१ हजार एव्हढे आहे.
मागील वर्षी बँकेचा एनपीए २७.५८ टक्के इतका होता तो आता १३.८७ टक्क्यांनी कमी होवून ३१ मार्च २०२१ अखेर एनपीए १३.७१ टक्के झाला आहे. म्हणजे बैंक नफ्यात आणल्या जात आहे.

३१ मार्च २०२१ अखेर जिल्हा बँकेचा सकल नफा ६० कोटी ३५ लाख १९ हजार एव्हढा झाला आहे. तर बँकेचा निव्वळ नफा हा ३ कोटी ३९ लाख ६९ हजार एव्हढा झाला आहे. हे सर्व करीत असतांना बैंकेचे हित जोपासताना बैंकेच्या हिताच्या विरोधात जो कुणी आला मग तो संचालक का असो ना, रावत यांनी कठोर भुमिका घेवुन नियमान्वये सर्व प्रकरणे हाताळली. यामधे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा हस्तक्षेप देखील रावत यांनी खपवून घेतला नाही. व ही बँक शेतक-यांची असुन तीला धक्का लागणार नाही हे ब्रीद घेवून रावत यांची अध्यक्षपदावरुन वाटचाल सुरु आहे.

बँकेचे नविन अध्यक्ष व संचालक मंडळाने मागील वर्षभरात बँकेच्या हितासाठी घेतलेल्या या भूमिकेचे व बँकेच्या आर्थीक विकासाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे. व जिल्हा बँक ही रावत यांच्या हातात सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.