गोपाणी कंपनीत दुसऱ्या दिवशी कामगारांचा आंदोलन सुरूच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : गोपानी कंपनीने कामगारांना कुठल्याही प्रकारची माहिती व सूचना न देता मेंनगेटला टाळे लावून कामगारांना बाहेर ठेवले. आज दुसऱ्या दिवशी कामगार कंपनी गेट बाहेर निर्देशने करीत आहे. कामगारांच्या समस्या तोडगा काढण्या करिता 15 सप्टेंबर रोजी राज्य सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे बैठक असून बैठकीत तोडगा न निघाल्यास ताडाळी एम. आय. डी.सी स्पंज आर्यन कामगार संघटने तर्फे दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वाखाली कंपनी गेट समोर बेमुद्दत आंदोलन करण्यात येणार आहे.

गोपाणी कंपनीत मागील सतरा वर्षांपासून कार्यरत एकशेवीस कामगारांना 03 सप्टेंबर रोजी कंपनी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता बंद केले होते.

10 सप्टेंबरच्या पहाटेच कंपनीतील ठेकेदार माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, त्यांचीच बहीण महालक्ष्मी कंपनीचे सौ.संगीता थेरे, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा भाचा मोनू चौधरीचे काली सेक्युरिटी सर्विस, सेलगा स्टील एजन्सी मधील जवळपास सातशे कामगारांना कामावर घेण्यास मज्जाव केला आहे.

कामगारांनी वेतनवाढ मांगीतल्याचा वचपा कंपनीने एकशेवीस कामगारांना काढून व आता उर्वरित कामगारांना कंपनी बाहेर केले आहे. रातो – रात कामगारांना कामावरून कमी केल्याने पांचशे कुटूंबियांचा भविष्य अंधारात आलेला आहे.