घोडपेठ ग्रामपंचायतीवर ग्रामविकास शेतकरी पॅनलची सत्ता

0
303
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• अनिल खडके सरपंच तर प्रदीप देवगडे उपसरपंच

• भाजपाच्या दोन सदस्यांनी केली बंडखोरी
कांग्रेसचे चार व भाजपाचे दोन मिळून सहा सदस्यांची सत्ता स्थापन

भद्रावती (घोडपेठ) : एकूण अकरा सदस्य असलेल्या तालुक्यातील घोडपेठ या मोठ्या ग्रामपंचायतीवर कांग्रेस नेते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात कांग्रेसप्रणित ग्रामविकास शेतकरी पॅनलची सत्ता आज (दि.12) ला बसली. यामधे सरपंच अनिल खडके तर उपसरपंच प्रदीप देवगडे झाले.
या सत्ता स्थापनेत काँग्रेसच्या अनिल खडके, ईश्वर निखाडे, सौ. ज्योती मोरे, सौ. बावने ताई, या चार सदस्यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदीप देवगडे, सौ. बोबडे ताई या दोघांनी बंडखोरी केली व कांग्रेसप्रणित ग्रामविकास शेतकरी पॅनलमधे सहभागी झाले. अशाप्रकारे एकूण सहा सदस्यांची मिळून सत्ता स्थापन झाली. तालुक्यात या ग्रामपंचायत सत्ता निवडीकडे दिग्गजांचे लक्ष लागुन होते, त्यामुळे ग्रामविकास शेतकरी पॅनलची ही उपलब्धी आहे.

यावेळी झालेल्या सत्ता स्थापनेच्या प्रसंगी कांग्रेस नेते रविंद्र शिंदे, दिनेश पाटील चोखारे, तालुका अध्यक्ष भगतसिंग मालुसरे, विलास खडके विनोद घुगुल, अजय जयस्वाल व समस्त गावकरी मडंळी हजर होते. कांग्रेस नेत्यांतर्फे सर्व पदाधिकारी तथा सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. सत्तास्थापनेनंतर मोठा जल्लोष गावात करण्यात आला.