केळझर नदीकाठावरील पाण्याची टाकी कोसळली; मजूर दबून ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मूल तालुक्यातील केळझर येथील नदीवरील पाण्याची टाकी कोसळल्याने मोटर पंप लावण्यासाठी गेलेल्या पुंडलिक मराठे (२५) या मजूर युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी(12मे) ला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.

मजुराच्या मृत्यूची वार्ता गावात कळताच, गावकरी घटनास्थळी गोळा झाले असून, जोपर्यंत मृतकाच्या वारसांना भरपाई दिली जात नाही तोपर्यंत प्रेत उचलू देणार नाही अशी भूमिका घेतल्याचे माहिती आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार, संवर्ग विकास अधिकारी यांनीही घटनास्थळी उपस्थित झाल्याची माहिती आहे.

मागील तीन-चार दिवसापासून केळझर येथील पाणीपुरवठा करणारे मोटर पंप बिघडल्याने हा पंप दुरुस्त करून आज ग्रामपंचायत कर्मचारी पुंडलिक मराठे यांना सोबत घेऊन पंप लावण्याकरिता गेला. नालीचा उपसा करत असताना आधीच क्रॅक असलेली पाण्याची टाकी कोसळल्याने त्यात पुंडलिक मराठे दबून जागीच ठार झाला.

पुंडलिक मराठे याला दोन वर्षाचा एक आणि एक वर्षाचा एक असे दोन लहांनगे मुल असून, त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.