प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. सिल्वर ओकवर चाललेल्या 3 तासाच्या या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या या भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता भाजपला सत्तेत बसवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी भाजप विरोधात मोहिम उघडली की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, स्थालांतरीत मुस्लिमांचा मुद्दा, सीएए-एनआरसीचा मुद्दा चर्चेत आल्यापासून प्रशांत किशोर यांनी भाजपपासून चार हात लांब केले आहेत. नैतिकतेच्या मुद्यावरून निवडणूकीत मी मदत करेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. गेल्या 4 वर्षात त्यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काही काळात केंद्रात भाजपविरोधात एक नवा पर्याय उभा करण्याच्या तयारीत प्रशांत किशोर दिसत आहेत.