घुग्घुस येथील आम आदमी पार्टीने केली स्वतः घाण कचऱ्याची स्वच्छता

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील अमराई वार्ड क्रं.०१ हिंदू स्मशान भूमी जवळ नगरपरिषद घुग्घुस द्वारा कचरा तिथे टाकण्यात येतो. ज्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना प्रदूषण आणि घाण त्यामुळे होणाऱ्या अनेक प्रकारच्या बिमाऱ्याना तोंड द्यावे लागत आहे.

यासर्व गोष्टींना लक्षात घेऊन आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा नगरपरिषद घुग्घुस ला १६ मार्च २०२१ रोजी निवेदन देण्यात आले तरीसुद्धा तिथे कचरा टाकण्यात येत आहे आणि कचरा साफ करण्यात आला नाही.
ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे जिथे भारत सरकार द्वारा स्वच्छ भारत अभियान राबविल्या जातो तिथेच दुसरी कडे खुलेआम नगरपरिषद घुग्घुस द्वारा कचरा फेकल्या जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी नागरिकांना व लहान मुलांना आणि क्रीडा प्रेमींना लक्षात घेता कचरा उचलण्याकरीता मागणी केली परंतु नगरपरिषद घुग्घुस द्वारा लक्ष न दिल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

याच विषया ला घेऊन आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा ही मागणी केल्या जात आहे की इथे कचरा टाकणे बंद करण्यात यावे व येथील परिसर लवकरात लवकर स्वच्छ करण्यात यावा अन्यथा आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा आंदोलन केले जाईल. त्यामुळे स्वतः पुढाकार घेऊन घुग्घुस येथील आम आदमी पार्टीने घाण कचऱ्याची स्वच्छता केली. यावेळी उपस्थित होते