CO-WIN पोर्टलवर नोंदणी करताय,’…तर तुम्हाला पोर्टलवर ब्लॉक केलं जाईल’

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सध्या लसीकरण रामबाण उपाय आहे. तर, कोरोना लस घेण्यासाठी भारत सरकारच्या को-विन पोर्टलवर नोंदणी करता येते. मात्र, आता नोंदणीबाबत मोदी सरकारनं नवा नियम जारी केला आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेत तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते, तुम्हाला पोर्टलवर ब्लॉक केलं जाईल, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे.

कोरोना लसीच्या स्लॉटसाठी काही लोक वारंवार प्रयत्न करत आहेत, बऱ्याचवेळा ओटीपी जनरेट करत आहेत. स्लॉटसाठी 24 तासांत 1000 पेक्षा जास्त वेळा प्रयत्न करणाऱ्यांना 24 तासांत, तर 50 पेक्षा जास्त ओटीपी जनरेट करणाऱ्या वापरकर्त्यांना को-विन पोर्टल यापुढे ब्लॉक करणार आहे.

या पोर्टलवरून संबंधित वापरकर्त्यांना केवळ 24 तासांसाठीच ब्लॉक केलं जाईल. याशिवाय को-विन पोर्टलवर 15 मिनिटांत 20 पेक्षा जास्त वेळा सर्च रिक्वेस्ट पाठवल्यास सिस्टम वापरकर्त्यांना लॉग आउट करेल, असं एका अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं आहे. हा उपाय वापरकर्त्यांना मर्यादित करण्याचा एक भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. पोर्टलवर उपलब्ध स्लॉटसाठी पब्लिक सर्चचं एक ऑप्शन आहे. जिथं वापरकर्ते लॉगइन न करताही स्लॉट सर्च करू शकतात. एकापेक्षा जास्त अ‍ॅप्सवरून लसीसाठी स्लॉट बुक करण्याची सोय असल्यामुळं लोकांना लसीचे स्लॉट शोधणं जास्त सोपं जातं, असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

दरम्यान, नुकतंच केंद्र सरकारनं को-विन पोर्टलसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्या थर्ड पार्टीला आपल्या अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन, शेड्यूलिंग आणि व्हॅक्सिनेशन मॅनेजमेंट असमर्थ करण्याची परवानगी देतात. हे सध्यासाठी एक अपडेट आहे. कारण यापूर्वी अॅप फक्त उपलब्ध असलेल्या स्लॉटबद्दलची माहिती आणि अॅपच्या माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा देऊ शकत होतं. याआधी सरकारच्या आरोग्य सेतू आणि उमंग या दोन अॅपच्या माध्यमातून वापरकर्ते को-विन शिवाय रजिस्ट्रेशन आणि कोव्हिड-19 लसीची अपॉइंटमेंट बुक करू शकत होते.