भद्रावती | ‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्या

0
237

भद्रावती (चंद्रपूर) : ७ वर्षीय बालिकेवर ५ जानेवारी रोजी कॅडबरी घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणा-या नराधमाला ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी भद्रावती तालुका आम आदमी पार्टीतर्फे­ ११ जानेवारी रोजी येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनीलसिंग पवार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सदर घटना ही अमानविय आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करुन ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक सोनल पाटील, तालुका सचिव सुमित हस्तक, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, तालुका सदस्य मृणाल खोब्रागडे, सूरज पेंदोर उपस्थित होते.