BREAKING : चंद्रपूर दारूबंदी बाबत उच्चस्तरीय समितीची घोषणा, समितीमध्ये 13 सदस्यांचा समावेश

0
643
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात वर्ष 2015 ला दारूबंदीची घोषणा करण्यात आली मात्र त्यानंतर अवैध दारूचा पूर जिल्ह्यात आला. कोट्यवधींची दारू, लाखो तस्कर, कोट्यवधींचा मुद्देमाल पोलीस कारवाईत जप्त करण्यात आल्या, युती सरकार गेल्यावर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, व मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याची दारूबंदी उठवावी यासाठी प्रयत्न सुरू केले.

जिल्ह्यातील दारुबंदीसंदर्भात आलेल्या निवेदनाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे ही समिती गृह खात्याने जाहीर केली असून समितीमध्ये 13 सदस्यांचा समावेश, असून 8 अशासकीय तर 5 सदस्य निमंत्रीत, समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराचा कालावधी दिलेला आहे.

समितीमध्ये अध्यक्ष म्हणून माजी प्रधान सचिव रमानाथ झा, सदस्यात विधी तज्ञ एड. प्रकाश सपाटे, एड. वामनराव लोहे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्काचे प्रदीप मिश्रा, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, एड. जयंत साळवे, सामाजिक कार्यकर्ता बेबीताई उईके, निमंत्रित सदस्यांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तर सदस्य सचिव मध्ये राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे यांचा समावेश आहे.

2015 पासून जिल्ह्यात लागू केलेल्या दारूबंदीचे सामाजिक व आर्थिक परिणामाचा तुलनात्मक अभ्यास करणे, दारूबंदी संदर्भातील प्राप्त निवेदनांचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व अन्य संघटनांची भूमिका जाणून घेणे, दारूबंदीचे सर्वसाधारण परिणाम त्याबाबत समितीचे मत व निष्कर्ष असे कार्य समितीचे असणार आहे.