विदर्भाच्या पंढरीत 15 वर्षानंतर काँग्रेसचा झेंडा

0
347
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

सरपंचपदी किशोर वरारकर, उपसरपंचपदी लता गोहोकार

चंद्रपूर : विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा ग्रामपंचायतीत काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. सुभाष गोहोकार यांच्या नेतृत्वात काँग्रेस समर्थित युवा ग्रामीण परिवर्तन आघाडीचे ७ पैकी ५ उमेदवार बहुमताने निवडून आले. त्यात किशोर बापूराव वरारकर, लता अभीष गोहोकार, उषा संतोष मोहजे, वनीता विलास भोस्कर व नरेंद्र केशव पडवेकर उमेदवार बहुमताने निवडून आले.

नुकतीच सरपंचपदाची निवडणूक बुधवारी (ता.१०) पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजू धांडे व अव्वल कारकून विनोद निखाते यांनी सहाय्यक अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी सरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी किशोर वरारकर यांना ५ विरुध्द २ मताने विजयी झाले. तर उपसरपंचपदी लता गोहोकार यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जयसिंग पाटील गोहोकार यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना अभिनंदनपर मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिका-यांचे समस्त वढा गावकरी मंडळींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

नवनियुक्त सरपंच यांनी घुग्गुस काँग्रेस कार्यलयात सदिच्छा भेट दिली असता शहर अध्यक्ष राजुरेड्डी वरोशन पचारे (जिल्हाध्यक्ष काँग्रेस किसान सेल) पवन आगदारी (जिल्हाध्यक्ष काँग्रेस अनुसूचित जाती विभाग )कामगार नेते सैय्यद अनवर यांनी काँग्रेस पक्षाचे दुप्पटे घालून त्यांचे स्वागत केले.