हिरापूर ग्रामपंचायतवर शेतकरी संघटना, कॉग्रेस समर्पित ग्रामविकास आघडीची एकहाती सत्ता

0
125
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नांदाफाटा (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या हिरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी संघटना,कॉग्रेस समर्पित ग्रामविकास आघडीच्या सौ.सुनीता मोहन तुमराम (कॉग्रेस)तर उपसरपंचपदी श्री-अरुण नागोबा काळे(शेतकरी संघटना) यांची निवड करण्यात आली. तर नवनिर्वाचित सदस्य म्हणून सौ.प्रेमलता किशोर शेंडे,श्री-दृर्योधन सिडाम, सौ.माया गजानन सिडाम यांची नियुक्ति करण्यात आली.

शेतकरी संघटना ,काग्रेस समर्पित ग्रामविकास आघाडी तयार करून अत्यंत चुरशी च्य्या वातावरणात लढत झाली होती. यात सत्ताधारी मा. सरपंच व पक्ष यांना केवळ दोन सदस्यांवर समाधान मानावे लागले. शेतकरी संघटन चे तीन कोंग्रेस पक्षाचे दोन सदस्य असे संख्याबळ तयारकरून सत्ताधारी माजी सरपंचाला सत्तेपासून दूर ठेवण्यात ग्रामविकास आघाडीला अखेर यश आले.

माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मा. गनपत काळे तथा मा. सुभाषभाऊ धोटे (आमदार ,राजुरा विधानसभा क्षेत्र) यांच्या नेतृत्वात मा. मुरलीधर बल्कि यांनी ग्रामविकास आघडीचे नेतृत्व केले. राजेंद्र पाचभाई, दत्तात्रय डाहुले ,मोहन पावडे, सुनील पाचभाई, महेश काळे, किशोर शेंडे,वासुदेव लेडांगे,मारोती पावडे,प्रकाश पाटिल,मंगेश शीलरकर,प्यारेलाल वाघमारे, अनिल लोडे,गनपत चौथाले, देवराव ठाकरे,पांडुरंग पुनवतकर, सुनील कुमरे,जितेश काळे, सतीश चौधरी,मंगेश पावडे,अमोल पावडे,गुलाब सिडाम ,सुधाकर ढवस,नानाजी लोडे,संदीप मोहितकर, प्रमोद बल्कि,समाधान कामतकर,संजय अवगान, रवि वाघमारे,कुश,वराटे,सुनील शेडामे व संपूर्ण सन्मानिय जेष्ठ कार्यक्रत्याच्या अथकपरिश्रमातून ग्रामपंचायतीवर सत्ता बदल करण्यात यश आले.

सरपंच पदाच्या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीच्या सौ.सुनीता तुमराम,अरुण काळे, सौ.प्रेमलता शेंडे,सौ.माया सिडाम व दृर्योधन सिडाम यांनी सरपंचपदासाठी समर्थन दिले.
पाच वर्षानंतर पुन्हा शेतकरी संघटनेला व कोंग्रेस पक्षाला ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्यात यश आले आहे.