चंद्रपुरात 1235 कोरोनामुक्त तर 27 मृत्यू , 835 Positive

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 1235 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 835 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 27 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 75 हजार 198 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 62 हजार 751 झाली आहे. सध्या 11हजार 255 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 25 हजार 852 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 46 हजार 909 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 1192 बाधितांचे मृत्यू झाले आहे

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.