संतोषसिंग रावत यांचे कोविड आपात्कालीन परीस्थितीत जिल्हाभर कल्याणकारी कार्य सुरु

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

– दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपुर हे लोकोपयोगी कार्याचे ठरले माध्यम
– कोरिनाबाधित, शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब जनतेच्या आरोग्यसुविधेसह आर्थिक मदतीचे कार्य मोठ्या जोमात
– कांग्रेस पक्षाचे नेते असल्याने राज्य सरकार व पक्षनेतृत्वाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा

चंद्रपुर : एखाद्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेचा प्रमुख हा सामाजिक जाण असलेला व कल्याणकारी असेल तर त्या संस्थेची कार्यपध्दती ही लोकोपयोगीच होते. दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपुरचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत हे झाल्यापासून जिल्हा-बँकेच्या कार्यपध्दतीत याचप्रमाणे कल्याणकारी बदल घडून आलेला दिसून येतो.

संपुर्ण जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढलेला असुन या आपात्कालीन परीस्थितीत सहकार क्षेत्रातून दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपुर ही कोरिनाबाधित, शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब जनतेच्या आरोग्यसुविधेसह आर्थिक मदतीचे कार्य मोठ्या जोमाने करीत आहे.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपुरचे अध्यक्ष कांग्रेस पक्षाचे नेते संतोषसिंग चंदनसिंग रावत हे कोरोनाबाधितांसाठी अहोरात्र झटत आहेत. कोरोना-१९ विषाणुच्या प्रादुर्भावाच्या काळात दि. १५ एप्रिल पासुन रावत यांच्या द्वारे रुग्न सेवा सुरु आहे. संतोषसिंग रावत यांनी ४ ते ५ खासगी वाहन ॲाक्सीजनच्या व्यवस्थेसह उपलब्ध करुन दिली आहेत. मुल तालुक्यामधे डॅाक्टरांना रूग्णसेवेकरीता ॲाक्सीजनची कमतरता भासु दिली नाही. सोबतच २०० लोकांची जेवनाची व्यवस्था नियमीतपणे सुरु आहे. रुग्णांना बेड मिळवून देणे, लस (व्हॅक्सीन) साठी ॲानलाईन नंबर लावून देणे, आदी लोकोपयोगी कामे करीत आहेत.

संतोषसिंग रावत यांचे माध्यमातुन अनेक लोकहितार्थ कामे केल्या जात आहे. रावत हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले तेव्हापासुन शेतकरी व शेतमजुर यांना शेतकरी कल्याण निधी योजनेअंतर्गत तात्काळ आर्थीक मदत करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अनेक शेतकरी, शेतमजुर यांना या योजनेचा लाभ झाला आहे. त्यांच्या या कार्याची चर्चा संपुर्ण जिल्हयात होत आहे.
कांग्रेस पक्षाचे नेते असल्याने राज्य सरकार व पक्षनेतृत्वाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी सातत्याने अनेक आवश्यक बाबींसाठी पाठपुरावा करीत आहेत.

त्यांचे सोबत त्यांचे सहकारी माजी नगराध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुल चे सभापती घनश्याम येनुरकर, संदीप कारमलयवार, अखिल गांगरेडीवार, विनोद काबंळी, नगरसेवक सुरेश फुलझले आदींचे परीश्रम आहेत.