घुग्घुस : औद्योगिक शहर असलेल्या शहरात भर उन्हाळ्यात व लॉक डाउन मध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून हँडपंप, बोअरवेल तसेच नळाला सुद्दा पाणी येत नाही.
शहरातील बैरम बाबा नगर, साई नगर, सुभाश नगर, शालीक राम नगर, शास्त्री नगर,शिव नगर,राम नगर, बँक ऑफ इंडियाच्या मागे,अमराई, वॉर्ड नंबर दोन येथे पाण्यासाठी हाहाकार माजलेला आहे.
पाणी टंचाई दूर करण्यासाठी राजूरेड्डी हे स्वतः आपल्या दोन खाजगी टँकरने अनेक वर्षांपासून सकाळ सांयकाळ पर्यंत मोफत पाणी पुरवठा करतात मात्र त्यांचा हा प्रयत्न अपुरा पडत असल्याने त्यांनी नगरपरिषद प्रशासक निलेश गौड यांना घुग्घुस परिसरातील औद्योगिक कंपनीच्या माध्यमातून अजून चार वॉटर टॅंकर चालू करून नागरिकांना पावसाळ्या पर्यंत निःशुल्क पाणी वितरण करावे यासोबतच ज्या भागात नळाला पाणी येत नाही त्याची दखल घेऊन नळ पाणी पुरवठा सुरळीत करावा व शहरातील काही वॉटर एटीएम बंद असून चालू असलेल्या वॉटर एटीएमला थंड पाणी येत नाही याकडे ही तातळीने लक्ष द्यावे अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे.