तेलगु समाज भवण व आदिवासी समाज मंदिराच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमीपूजन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

उसगाव येथे आदिवासी समाज मंदिर तर घूग्घूस येथे बनणार तेलगु समाज भवण

चंद्रपूर : खनिस विकास निधीतून घुग्घूस येथे तेलगू समाज भवण तर ग्रामीण विकास निधीतून उसगाव येथे आदिवासी समाज मंदिराचे काम प्रस्तावीत करण्यात आले असून या कामाचे भुमीपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे. यावेळी राजू रेड्डी, माजी नगरसेवक बलराम डोडानी, उसगावच्या सरपंच निविता ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर, ग्राम पंचायम सदस्य मंगल फुलझेले, बाळा चरडे, यमुना राजूरकर, रेखा कोडापे, रेखा उईके, वर्षा बोंडरे, सरिता काळे, हनुमंता नैताम, शांताराम भोयर, विठ्ठल ठाकरे, नथ्थू जोगी, स्वप्नील ठाकरे, संदेश ठाकरे, गणेश बोडे, रवि उईके, रमेश ठाकरे, अमोल रायपूरे, खुशाल ठाकरे, मुन्ना लोडे, इम्रान खान, स्वप्नील वाढई, अनुप भंडारी, कल्याण सोदारी, मोहम्मद रफीक, प्रितम भोंगळे, सयद अनवर, बालकिशन कुळसंगे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, शिक्षण विभागाचे प्रमूख प्रतिक शिवणकर, युवा नेते अमोल शेंडे, विलास सोमलवार, पंकज गुप्ता, विश्वजीत साहा, हरमन जोसेफ, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, राम जंगम, प्रकाश पडाल, नितिन शाहा, राशिद हुसेन, बबलू मेश्राम, गौरव जोरगेवार आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या उसगाव येथे आदिवासी समाज बांधवांची संख्या अधिक आहे. त्यामूळे येथे आदिवासी समाजाचे समाज मंदिर तयार करण्यात यावे अशी येथील नागरिकांची मागणी होती. आमदार किशोर जोरगेवार विधानसभा निवडणूकीत येथे प्रचार करण्याकरीता गेले असता येथील नागरिकांनी ती बोलून दाखवली होती. यावेळी येथे सदर समाज मंदिर बनेल असे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने ग्रामस्तांना आश्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर आ. जोरगेवार यांच्या वतीने त्या दिशेने प्रयत्न सुरु करण्यात आल होते. अखेर या समाज मंदिरासाठी ग्रामविकास निधीतून 25 लक्ष रुपये मंजूर करण्यात आमदार किशोर जोरगेवार यांना यश आले. तसेच घूग्घूस येथे तेलगू समाज बांधवांचे स्वत:चे स्वतंत्र सभागृह निर्माण व्हावे अशी तेथील तेलगू भाषिक नागरिकांची जूनी मागणी होती, मात्र अनेकदा त्यांच्या पदरी निराशाच आली. परंतू आमदार किशोर जोरगेवार हे निवडून येताच येथे तेलगू समाज भवण निर्माण केले जाईल असा शब्द त्यांच्या वतीने देण्यात आला होता. खनिज विकास निधीतून सदर भवणासाठी 30 लक्ष रुपये देत आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. सदर दोनही कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नुकतेच भुमिपूजन पार पडले आहे.

चंद्रपूर येथील लालपेठ येथेही तेलगू समाज बांधवांचे समाज भवन तयार करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगितले असून उभारण्यात येणार असलेल्या या वास्तू समाज प्रबोधनासह समाज सक्षमीकरणासाठी उपयोगी पडव्यात अशी आशा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी समाज बांधवांकडून व्यक्त केली आहे. या भुमीपूजनाच्या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.