क्षुल्लक कारणावरुन महिला सरपंचाला मारहाण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : माजरी येथील आंबेडकर वार्ड मध्ये क्षुल्लक कारणावरुन चार लोकांनी माजरीच्या सरपंच व त्यांच्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची घटना घडली. सदर घटना शानिवारी सांयकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये सरपंच छाया नागेश जंगम जख्मी झाली.

याबाबत सविस्तर महिती अशी की, सरपंच छाया नागेश जंगम या बाहेरुन आपल्या घराकडे जात असताना शेजारी राहणाऱ्या महिलेनी अचानक शिवागाळ करने सुरु केली. यावेळी आरोपी महिलेचा मुलगा केतन रत्नपारखी तिथेच उभा होता. सरपंच या आरोपी महिलेचा मुलाला “तुझी आई वारंवार शिवागाळ करते तिला समजुत काढ़” असे बोलून आपल्या घरी निघुन गेली.

दरम्यान आरोपीनी घरालगत राहणाऱ्या सरपंचाच्या घरी जावून शिवीगाळ करून सरपंच व तिचा मुलगा राहुल जंगम या दोघांना मारहाण केली. मारहाणीत सरपंच छाया जंगम हिला डोक्याचे केस ओढून हाताला चावा घेतल्याने ती जख्मी झाली.

याप्रकरणी माजरी पोलिसांनी सरपंच छाया नागेश जंगम यांच्या फिर्यादी वरुन आरोपी संगीता उल्हास रत्नपारखी, उल्हास रत्नपारखी, कुंदन रत्नपारखी, केतन रत्नपारखी यांच्या विरुद्ध कलम ३२३,३२४,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात पोहा. रमेश तुराणकर करीत आहे.