कोंबड्यांवर चटकलेला हल्लेखोर बिबट्या अखेर पिंज-यात अडकला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोंबड्यांना भक्ष्य करणे भोवले

चंद्रपूर : सावली तालुक्यातील व्याहाड बुज, सामदा,व वाघोली बुट्टी, या परिसरात दहशत करून नागरिकांना जेरीस आणणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यास वन विभागाला यश आले आहे. आज 26 जुलै 2019 ला सायंकाळच्या सुमारास वन विभागाने मांडलेल्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. या परिसरातीतील गावात बिबट्या हा रात्रीच्या सुमारास कोंबड्यांना भक्ष्य करून त्यांच्यावर चटकलेला होता. अखेर त्याच कोंबड्यांना पिंज-यात ताव मारण्यासाठी घुसलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला आहे.

गावात बिबट्याचा शिरकाव होणे व घरात घुसून माणसांवर हल्ला करणे, कोंबड्यांवर ताव मारणे नित्याचे झाले होते. नागरिकांमध्ये प्रंचड दहशत झाल्याने बिबट्याला वनविभागाने व्याहाड बुज डोंगरी परिसरात जेरबंद करण्यासाठी वासेकर यांच्या गो वाडीला लागून पिंजरा मांडण्यात आला होता.

याच परिसरात झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबट्याला आजसोमवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पिंजरामध्ये कोंबड्या ठेवून वन विभागाने सापळा रचला आणि कोंबड्यांवर चटकलेला बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी पिंज-यात अडकला. वृत्त लिहीपर्यंत सुधार बिबट्या पिंजऱ्यात होता भविष्यात या बिबट्याला कोणत्या जंगलामध्ये सोडण्यात येणार याविषयी काही चर्चा नाही. मात्र या परिसरात बिबट्या जेरबंद झाल्याने निर्माण झालेल्या दहशतीपासून सुटकेचा श्वास घेतला आहे.