काॅंग्रेसचे रामू तिवारी  यांची मनपातील भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांनी घेतली भेट

• सभापती पदाच्या निवडणुकीची रणनिती असल्याची चर्चा

चंद्रपूर : काेरानामुळे लादलेले निर्बंध शिथील केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यासाठी शासनाने परवानी दिली आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज काॅंग्रेसचे शहर रामू तिवारी  यांना मनपातील भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांची भेट घेतली.

यामागे सभापती पदाच्या निवडणुकीची रणनिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये राहूल पावडे यांचा स्थायी समिती सभापतीपद गेले. त्यांना काेराेना मुळे आठ महिने अतिरिक्त कालावधी भेटला. त्यांच्याजागेवर आलेले आसवानी यांचे सभापती पद केवळ एप्रिल महिन्यापर्यंतच हाेते. आसावानी यांना सभापती पद मिळाल्यानंतर देशमुख नाराज झाले हाेते. भाजप नगरसेवकांचे यावेळी दाेन गट पडले. देशमुख यांना सभापती पदाच आश्वासन देऊन त्यांचे सभागृह नेते पद सुद्धा काढण्यात आले.  तेव्हापासून ते नाराज आहे. आसावानी यांचा मुदत संपल्यानंतर त्यांना निवडणुका घेण्यासाठी पत्र दिले. परंतु काेराेनाचा दुसरा लाट आली आणि निवडणुका टळल्या. आता जिल्हाधिकारी यांनी निवडणुका घेण्याची परवानगी दिली आहे.

स्थायी १६ सदस्यांमध्ये भाजपचे दहा आहे. यावर्षी विद्यमान सभापती रवी आसावानी, संजय कंचर्लावार आणि सुभाष कासनाेटृवार निवृत्त हाेतील. त्यांच्याएेवजी कुणाला आत पाठवायचे याचा अधिकार देशमुख यांच्याकडे असणार आहे. ते सुध्दा या निवडणुकीची वाट बघत आहे. त्यातच तिवारी यांनी त्यांची भेट घेतली. सभापती पदाच्या निवडणुकीत मित्र पक्ष देशमुख यांना मदत करतील असे आश्वासन तिवारी यांनी दिल्याचे समजते. परंतु तिवारी यांनी हा आराेप फेटाळून लावला. मित्र म्हणून भेट घेतली असे ते म्हणाले.