नाल्यात ट्रॅक्टर पलटी; तिघांचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• तिघे सुखरूप बचावले
• मृतकामध्ये एकाच कुटूंबातील मायलेकीचा समावेश

चंद्रपूर : शेतीचे कामे करून परत घरी येत असताना नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने तिघांचा करून अंत झाला असून तीन सुखरूप बचावले. मृतकांमध्ये माधुरी विनोद वंगणे (वय 27), मलेश शेंडे (वय 45), आणि लक्ष्मी विनोद वगने (वय 7) यांचा समावेश आहे. ही घटना आज रविवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घडली.

राजुरा शहरा पासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावातील मल्लेश शेंडे यांच्या शेतात मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. शेतीचे काम संपून राजू डामिलवार यांच्या मालकी चे ट्रॅक्टरवर बसून घरी परत येत असताना अचानक आलेल्या पावसाने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला होता. ट्रॅक्टर कल्टिव्हेटरसह नाल्यात टाकल्यानंतर तो वाहून जावू लागला. दरम्यान ट्रॅक्टर नाल्यात पडल्याने मृतक माधुरी विनोद वंगणे (वय 27), मलेश शेंडे (वय 45), आणि लक्ष्मी विनोद वगने (वय 7) यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मालक राजू डामिलवार , बाधू कुमरे व बालवीर कोवे सुखरूप बचावले. वृत लिहे पर्यंत मृतक माधुरी विनोद वंगणे व लक्ष्मी विनोद वगने यांचा मृतदेह सापडला तर मलेश शेंडे अद्याप लापता होते.

या घटनेने देवाडा येथे एकाच घरचे आई व मुलगी मरण पावल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे. घटनास्थळी राजुरा पोलीस पोहचले असून शेंडे यांचा शोध सुरु आहे.