लातूरच्या एका खाजगी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने एक व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली आहे. या व्हिडीओमधून तरुणीने आपल्या वेदना मांडल्या आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.
आयुष्याच्या परिक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असे म्हणत या तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस तपास करत आहेत.
संबंधित आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव सोनू शेख असून ती लातूरमधील एका खाजगी महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. मृत सोनू शिक्षण घेत असतानाच पार्ट टाइम जॉब देखील करत होती. आता हे सगळं मला सहन होतं नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही सोनूने व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये. मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे, की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी. कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल” असे सोनू आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, व्हिडीओ पोस्ट करत लातुरात तरुणीची आत्महत्या
@latur_police @TV9Marathi pic.twitter.com/fOlzGIa8eq— Akshay Adhav (@Adhav_Akshay1) June 13, 2021
विशेष सूचना : हा व्हिडीओ संवेदनशील आहे पण आजचे विद्यार्थी किती तणावाखाली आहे, हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असल्याने हा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवतोय…