उपचार घेत असलेल्या ‘त्या’ महिलेचाही मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 गॅस गळतीने मृत्यू झालेल्या मृतांचा आकडा पोहचला 7 वर

चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगतच्या दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या पुन्हा एका महिला सदस्याचा मृत्यू झाला आहे. दासू रमेश लष्कर या असे मृत महिलेचे नाव आहे. मृतांमध्ये आता एकूण 7 जणांचा समावेश झालेला आहे.

मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०), दासू रमेश लष्कर(४०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. अख्खे कुटूंब विवाह सोहळ्यानंतर आनंदात होते मात्र सोमवारची रात्र लष्कर कुटुंबासाठी काळरात्र ठरली आहे. मृतांमध्ये १० वर्ष आणि ८ वर्षाच्या बालकांचा समावेश आहे. घटना आज मंगळवारी (13 जुलै) ला पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे दुर्गापुरात शोककळा पसरली आहे.

लष्कर कुटुंबातील अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) , दासू रमेश लष्कर(४०)आदी सर्व जण कोराडीला गेले होते. सोमवारी सर्वजण कोराडीहून दुर्गापुरातील निवासस्थानी आले. रात्री जेवण आटोपले. यादरम्यान वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे दुर्गापूर भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे घराच्या आत असलेले जनरेटर लावून हे कुटुंब झोपले. घर बंद होते. त्यामुळे जनरेटरमधून गॅस गळती झाली. त्यात सहा जणांचा मुत्यू झाला. लष्कर कुटुंबाचे नातेवाईक शेजारी राहतात. सकाळी कुणीच उठले नसल्याचे पाहून त्यांनी दार ठोठावले. पण कुणीच दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडण्यात आले. आत सात जण पडून होते. त्यानंतर सर्वांना विश्वास झाडे हॉस्पीटलमध्ये उपारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, सहा जणांना डॉक्टरांना मृत घोषित केले आणि एक महिला
दासू रमेश लष्कर(४०) ही महिला जिवंत असल्याने सर्वप्रथम चंद्रपूर आणि त्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. नागपुरात उपचारादरम्यान सदर महिलेचाही मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्तांचा आकडा सात वर गेला आहे.

रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण मृत्युमुखी पडल्याने दूर्गापुर परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे लष्कर कुटुंबात सात सदस्य होते. या दुर्दैवी घटनेत सगळ्या सदस्यांचा मृत्यू झाला आहे.