गॅस गळतीने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

एका सदस्यावर उपचार सुरु; प्रकृती स्थिर

चंद्रपूर : शहरालगतच्या दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.

दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. ही घटना आज मंगळवारी (13 जुलै) ला पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे दुर्गापुरात शोककळा पसरली आहे.

रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. त्यामधील एकाचे प्राण वाचले आहेत. गॅस गळतीचं प्रकरण लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत डॉक्टर विश्वास झाडेंच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आलं. तर एका सदस्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.