BREAKING : SDM ची रेती तस्करावर धडक कारवाई ;  24 ट्रॅक्टर केले जप्त

घुग्घुस : मागील अनेक दिवसांपासून वर्धा नदीच्या चिंचोली आणि हल्ल्या घाटावर दिवसरात्र बिनधास्तपणे रेती तस्करी शुरू असल्यामुळे तहसीलदार सह महसूल विभाग व जिल्हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात होता.

आज दिनांक 14 जानेवारी रोजी पहाटे 05 वाजता वर्धा नदीच्या हल्ल्या घाटावर महसूल अधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या पथकासह धाड घातली असता त्याठिकाणी अवैध रेती तस्करी करीता असलेल्या 24 ट्रॅक्टर वर छापा मार कारवाई केल्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणानून गेले.

या कारवाईत प्रती ट्रॅक्टर एक लाख दहा हजार नवशे रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. जप्त केलेले वाहन घुग्घुस तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेले आहे.