BREAKING “शुभम” च्या मारेकऱ्याला चार दिवसाची पोलीस कोठडी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• शोकाकुल वातावरणात शुभमवर अंत्यसंस्कार

• पोलीस कोठडी दरम्यान हत्येचे रहस्य उलगडणार

चंद्रपूर : घुग्घूस येथील वेकोलि रामनगर वसाहतीतील इंजिनियरींग विद्यार्थी शुभम दिलीप फुटाणे (25) हत्या प्रकरणातील आरोपी गणेश पिंपळशेंडे ह्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले होते. यावेळी हत्या प्रकरणातील रहस्य उलगडण्याकरिता हेतुने न्यायालयाने चार दिवस आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर मृत शुभमच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. पोलिस कोठडी दरम्यान शुभमच्या हत्येबाबतच्या माहितीचा उलगडा होणार आहे.